इंग्लडची राणी व्हिक्टोरिया यांच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा जवळपास १ लाख ३० हजारांच्या आसपास लिलाव करण्यात आला. १८४० मध्ये त्यांचा अल्बर्ट यांच्याशी विवाह झाला होता. खिश्चन लग्नात केक कापण्याची पद्धत आहे. या वेडिंग केकला विशेष महत्त्व असते. त्यावेळचा हा केक आहे. राणीच्या लग्नातील या केकचे जतन करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास १७६ वर्षांनी या केकच्या तुकड्याचा लिलाव करण्यात आला आहे. या तुकड्यावर १ ५०० पौंडाची बोली लागली होती. हा केकचा तुकडा जर्सीतल्या संग्राहक डेव्हिड गेंसबरो रॉबर्ट यांच्याकडे होता. त्यांनी हा केकचा तुकडा लिलावासाठी काढला. केकसोबत द क्वीन्स ब्रायडल केक बंकिगहम पॅलेस असे लिहलेला बॉक्सचा देखील लिलाव करण्यात आला आहे. १० फेब्रुवारी १८४० मधला हा बॉक्स आहे. तसेच राणी विक्टोरिया यांची स्वाक्षरी असलेला आणि शाही मोहर असेल्या कागदाचा लिलावही यावेळी करण्यात आला.