आमदार आणि खासदार यांचा कायमच दबदबा असतो. त्यांच्याकडे असलेल्या पदामुळे त्यांना समाजात मानही असतो. तसेच त्यांच्यावप होणारे वेगवेगळे आरोप आणि प्रत्यारोप यामुळे ते चर्चेतही असतात. मात्र युरोपमधील स्लोवेनिया देशातील एक खासदार एका आश्चर्य वाटेल अशा गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ही गोष्ट वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तर या खासदारांनी सुपरमार्केटमधून सँडविचची चोरी केले. इतक्या मोठ्या पदावर असताना अशाप्रकारे चोरी करणे त्यांना भलतेच महागात पडले. या चोरीमुळे संसदेत संबंधित खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बऱ्याच आरोप-प्रत्यारोपांनंतर या खासदाराने आपण चोरी केल्याचे कबूल केले.

स्लोवेनिया येथील सत्ताधारी पक्षाचे खासदार दारची क्रेजिसिच यांच्याबाबत ही घटना घडली. ‘सॅंडविच घेताना सुपरमार्केटमधील कोणताही कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे काही वेळ वाट पाहून मी पैसे न देताच मी बाहेर आलो’. असे त्यांनी एका चर्चेदरम्यान सांगितले. संसदेत देशातील सुव्यवस्थेवर होत असलेल्या चर्चेत सहभागी झाले असताना या सॅंडविच चोरीचा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात दारची यांनी हे सत्य मांडले असले तरीही या घटनेचा उल्लेख झाल्यानंतर संसदेत विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांचा जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली.

आपल्याला अशाप्रकारे विरोध होत असल्याचे पाहून खासदार दारजी यांनी स्वत:च त्यांचा राजीनामा स्पीकरकडे सोपवला. दारजी यांनी संसदेत स्वत: त्यांचा गुन्हा मान्य केला. आपण प्रयोग म्हणून अशाप्रकारे सँडविच घेऊन निघाल होतो असेही दारजी यांनी नंतर सांगितले. नंतर आपण याचे पैसे देण्यासाठी गेलोही होतो असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना विरोध दर्शविला गेल्याने त्यांनी राजीनामा दिला. सभागृहातील सदस्यांना सर्विलंस सिस्टीमच्या टेस्टिंगबाबत सांगणे हा होता, त्यामुळे आपण हे उदाहरण दिल्याचे ते म्हणाले.

Story img Loader