Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो, लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडीओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडीओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून युजर्सला हसू आवरता येत नाही. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. सोशल मीडियावर पापा की परी आणि त्यासंबंधीत व्हिडीओ ट्रेंड होताना तुम्ही पाहिलं असेल. अशावेळी मुलींनी काहीही केलं तरी लोक त्यांना पापा की परी असं म्हणतात. मुली काहीतरी हटके करायला गेल्या आणि तो जर त्यांचा प्रयत्न फसला तर नेटकरी मुलींची चांगलीच थट्टा करतात. पापा की परी म्हणून चिडवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र पापा की परी म्हणून चिडवणाऱ्यांना एका तरुणीने उत्तर दिलंय.
सिनेमात किंवा प्रत्यक्षात अनेकदा बाइक रेसिंग पाहिली असेल. लोक सुसाट वेगाने बाइक चालवतात. तसेच तुम्ही स्लो सायकल खेळाबाबतही ऐकलं असेल. मात्र, स्लो बाइकची स्पर्धा क्वचितच पाहिली असेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तुम्हाला स्लो बाइक रेसिंग बघायला मिळत आहे. जी व्यक्ती बाइक स्लो चालवेल ती यात विजेती ठरते. या अनोख्या रेसमध्ये एक तरूण आणि एका तरूणीने भाग घेतला आहे. यात कोण जिंकतं हे बघणं मजेदार ठरेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जमिनीवर चुन्याच्या मदतीने ट्रॅक बनवण्यात आले आहेत. ज्यात एक तरूणी आणि एक तरूण रेसिंग करत आहेत. हे रेसिंग पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे तरूणी या रेसिंगमध्ये विजयी ठरली आहे. फास्ट रेसिंगमध्ये नियम असतो की, जो सगळ्यात वेगाने चालवून लाइन पार करेल ती व्यक्ती जिंकेल. मात्र, स्लो रेसिंगमध्ये नियम उलटे असतात. यात जो स्पर्धक सगळ्यात स्लो बाइक चालवेल तो जिंकतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वृद्ध पोलिसासोबत रिक्षाचालकानं काय केलं पाहा
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mr_histry_r नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “पप्पांच्या परीचा नाद नाय करायचा” तर आणखी एकानं म्हंटलंय, “वाह वाह कमाल”