Viral Video: हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. यांपैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय; ज्यात एक लहान चिमुकला गाणं गाताना दिसत आहे.

लहान मुलं खरंच खूप गोड आणि निरागस असतात. त्यांचं बोलणं, वागणं याकडे नकळत आपलं लक्ष वेधलं जातं. हल्ली सोशल मीडियामुळे तर एखादं गाणं ऐकल्यावर ते लगेच त्यांना तोंडपाठ होते. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे नवनवीन व्हिडीओ सतत पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात एक चिमुकला एक सुंदर गाणं गात गात असं काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकला आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं गात आहे. हे गाणं तो त्याच्या पद्धतीनं गात असून, मधे मधे तो अभिनयही करत आहे. त्याशिवाय गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तो विविध हावभावही करीत आहे. चिमुकल्याचा हा गोड व्हिडीओ पाहून नेटकरीही लोटपोट झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_epic_jokes या अकाउंटवरून शेअर करअयात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. अनेक युजर्स कमेंट्सही करीत आहेत.

हेही वाचा: ‘शेवटी आनंदी राहण्याचा हक्क सर्वांना…’ एअर वॉकरवर उभं राहून श्वान करतोय मज्जा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “किती खूश…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, गणपतीच्या उंदरानं तुझे दातपण पळवले का? तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, कार्टून लय आगाव दिसतंय. तर आणखी एकानं लिहिलंय की, निळू फुले व्हर्जन आहे हा. आणखी एकानं लिहिलंय की, हे कार्ट अभ्यास करीत नाही म्हणून त्याच्या पप्पांनी त्याला मारलं.