लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनासोर राहत होते. जे हत्तींपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. यातील काही डायनासोरच्या शेपटीच फक्त ४५ ​​फुटांपेक्षा जास्त लांब होत्या. यावरून ते किती मोठे असतील याचा अंदाज लावता येऊ शकतो. सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक महाकाय उल्का पडल्यामुळे या महाकाय प्राण्यांचा अंत झाला. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून आजच्या काळातही डायनासोर जिवंत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, या व्हिडिओमध्ये डायनासोरसारखे दिसणारे काही विचित्र प्राणी जंगलात धावताना दिसत आहेत. हा खूपच आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून ही डायनासोरची पिल्ले आहेत का? असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होईल. खऱ्या डायनासोरच्या तुलनेत या प्राण्यांची उंची खूपच लहान असली तरी त्यांच्याप्रमाणेच त्यांची मान नक्कीच मोठी दिसत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे शाकाहारी डायनासोरची मान अशी पातळ आणि उंच असायची. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, हे खरंच डायनासोर आहेत की इतर प्राणी आहे.

( हे ही वाचा: Video: सिंहिणीसोबत घरात मस्ती करत होता ‘हा’ लहान मुलगा; अचानक तिने हात जबड्यात पकडला अन् तितक्यात)

व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे प्राणी इकडून तिकडून पळत आहेत

( हे ही वाचा: Video: आगीबरोबर स्टंट करायच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग; ‘तो’ पायजमा काढून पळत सुटला अन..)

हा आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि ‘हे डायनासोर कुठून आले?’ असा कॅप्शन या व्हिडिओसोबत लिहिला आहे. अवघ्या ११ सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. तर जंगलात फिरणारे हे डायनासोर नसून त्यांची शेपटी लांब आहे जी डायनासोरच्या मानेसारखी दिसत आहे. कोणीतरी एडिटिंगच्या माध्यमातून हे प्राणी डायनासोरसारखे दिसावेत म्हणून उलटे चालवले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small dinosaurs were seen running in the forest people confused after see the viral video gps