सध्या सोशल मीडियावर पदार्थांची रेसिपी दाखविणारे, वेगवेगळ्या पदार्थांची माहिती देणारे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. कुणी भल्यामोठ्या आकाराचे केक बनवितानाचे व्हिडीओ शेअर करतो, तर कुणी अगदी गावच्या पद्धतीने पदार्थ बनवून दाखवितात. मात्र, सध्या एका चिमुकल्या शेफचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक अत्यंत गोंडस लहान मुलगा त्याच्या आजोबांसाठी खास सॅण्डविच बनवीत असल्याचे दिसते आहे. या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर natureferver नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. व्हिडीओमध्ये अंदाजे तीन-चार वर्षांचा एक मुलगा चुलीवर अन्न शिजविण्यासाठी तापत ठेवलेल्या एका सपाट दगडावर तेल लावून घेतो. त्यानंतर त्याने अंगावर घातलेल्या जॅकेटमधून अगदी स्टाईलमध्ये पाव / ब्रेड काढून गरम दगडावर टाकून त्यावर झाकण ठेवतो. दुसऱ्या बाजूला एक अंडे फोडून त्यावर चिली सॉस आणि बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेतो. शेवटी भाजलेल्या पावाचे दोन तुकडे करून, त्यामध्ये एक लेट्युसचे पान ठेवून, त्यावर तयार केलेले अंड्याचे आम्लेट ठेवतो आणि दुसऱ्या पावाच्या तुकड्याने सॅण्डविच बंद करून घेतो.

हेही वाचा : ‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल’ ट्रेंडवर आजीबाईंनी केला भन्नाट डान्स; पाहा हा व्हायरल Video….

अशा पद्धतीने या गोंडस चिमुकल्याने अतिशय नेटक्या पद्धतीने सुंदर सॅण्डविच बनवून तो आजोबांकडे जातो आणि त्यांना ते खाण्यासाठी देतो. व्हिडीओच्या शेवटी आजोबा आणि तो चिमुकला दोघे मिळून आनंदाने त्या सॅण्डविचचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळते. या व्हिडीओने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.

“हे सगळं करण्यासाठी अजून तो खूप लहान आहे… पण तरी त्याला हे करावं लागतंय” असे एकाने लिहिले आहे.
“त्याला मोठ्यांचा आदर करता येतो आणि तो मुलगा ते करून दाखवतोय”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“या व्हिडीओने मन जिंकले”, असे तिसऱ्याने लिहिले आहे.
“तो ज्या पद्धतीने आपल्या आजोबांसाठी जेवण बनवीत आहे ते पाहून खूप मस्त वाटले”, असे चौथ्याने म्हटले.
“खूपच सुंदर. या मुलाला खूपच चांगली शिकवण दिली आहे”, असे शेवटी पाचव्याने लिहिले आहे.

हेही वाचा : बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @natureferver नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small kid making sandwich for his grandfather viral video netizens praising the young chef watch dha