अनेक वेळा घाईघाईत स्त्री किंवा पुरुष दोघेही पॅन्टची चेन बंद करायला विसरतात, त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी लाजिरवाणे व्हावे लागते. पण आता तुम्हाला असे वाटण्याची गरज नाही. आतापर्यंत तुम्ही स्मार्ट टेक्नॉलॉजी उपकरणे ऐकली असतील आणि वापरली असतील. पण तुम्ही कधी स्मार्ट पँट ऐकली आहे किंवा घातली आहे का? मात्र, आता अशी स्मार्ट टेक्नोलॉजी निघालेय की टची चैन उघडी असेल तर लगेच मोबाईलवर अलर्ट येईल. आता स्मार्ट टेक्नॉलॉजी असलेली पॅन्ट बाजारात आली आहे, जी चेन उघडी राहिल्यावर तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन पाठवेल, त्यानंतर तुम्ही तुमची चेन बंद करू शकता. यासंदर्भातला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता चार चौघांत हसं होणार नाही

हल्ली स्मार्ट टेक्नोलॉजीमुळे हातात असलेल्या मोबाईलवर सर्व गोष्टींचे अलर्ट मिळते. अगदी आरोग्याशी संबधीत अलर्ट देखील मोबाईलवर येत असतात. मात्र, आता स्मार्ट पॅंट टेक्नॉलॉजीमुळे पँटची चैन उघडी असेल तर याचा देखील अलर्ट मिळणार आहे. या स्मार्ट पँटच्या चैन जवळ खास सेन्सर असणार आहे. एका अॅपद्वारे पँटचे हे सेन्सर मोबईलशी कनेक्ट केले जाणार आहे. यामुळे पँट घातल्यानंतर जर पँटची चैन उघडी राहिल्या सेन्सरद्वारे मोबाईलवर अलर्ट येईल. जेणेकरुन या अलर्टमुळे तुम्ही लगेच पँटची चैन लावू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Photo: दुपारच्या जेवणात मृत साप; शाळेतील ५० विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये दाखल!

आत्तापर्यंत, तुम्हाला ही पँट ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये सापडणार नाही. ही पँट एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या मित्रासाठी बनवली होती. मात्र भविष्यात तुम्हाला असे स्मार्ट तंत्रज्ञान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart technology viral if the pant chain is left open an alert will come on the phone this technology will save your embarrassment in public srk