disadvantages of smartphone cover: मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या एका क्लिकवर करता येते. स्मार्टफोन एक गरज तर आहे. पण, काही मॉडेल असेही आहेत जे स्टेटस सिम्बॉल देखील दर्शवतात, तर काही मॉडेल्स अशी आहेत ज्यांची रचना खूप सुंदर आहे किंवा आकर्षक आहे. फोनला फिजिकल डॅमेज होऊ नये म्हणून अनेकजण बॅक कव्हरचा पर्याय निवडतात. वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारांचे अगदी स्टायलिस्ट बॅक कव्हर सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

स्मार्टफोनला नव-नवीन कव्हर लावताय?

अशा परिस्थितीत आपला मोबाईल नेहमी स्टायलिश दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि हल्ली सगळ्यांकडेच महागडे मोबाईल असतात, त्यामुळे मोबाईल अनेक दिवस चांगला राहावा यासाठी लोक त्यावर कव्हर देखील वापरतात. पण, यामुळे स्मार्टफोनचे काही अंशी नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे जाणून घ्या कव्हर वापरल्याने मोबाईलचे नेमके काय नुकसान होते.

shocking video
VIDEO : पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाने ५०० रुपये दिले नाही, पुढे कर्मचाऱ्याने असे काही केले… व्हिडीओ होतोय व्हायरल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
How To Manage Cold Naturally Without Medication Home Remedy For Cold And Cough
हवा बदल झाल्याने सर्दी-कफाने बेजार? पाच सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम, वाटेल फ्रेश
chillies for gut health
मिरची देठासह खावी की देठाशिवाय? तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी कोणती पद्धत आहे योग्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Viral Post Shows Cab driver printed the six rules For Passengers
Viral Post : ‘तुमचा अ‍ॅटिटय़ूड खिशात…’ प्रवाशांसाठी कॅब चालकाचं पोस्टर, नियमांची यादी वाचून व्हाल थक्क
The ultimate vitamin cheat sheet: Top foods packed with vitamins A to K for better health
केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…

काय नुकसान होते जाणून घेऊया

थंडीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण ब्लँकेट वापरतो, परंतु तेच उन्हाळ्यात तसे करत नाही. कारण आपल्याला आधीच गरम होत असतं. त्याचप्रमाणे एरवी जास्त मोबाईल वापरल्यामुळे मोबाईल गरम होतो, अशात उन्हाळ्याच्या दिवसात स्मार्टफोन जास्त वापरल्याने गरम होतो आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही मोबाईल कव्हर देखील लावले असेल तर फोन आणखी गरम होतो. उष्णतेमुळे फोनच्या कार्यक्षमतेवरही याचा परिणाम होतो. नेहमी असे होईलच असे नाही. परंतु, नियमीत ते वापरल्यास असे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुलांना स्मार्टफोन देणाऱ्या पालकांना आनंद महिंद्रांनी दिला इशारा, शेअर केला महत्त्वाचा रिसर्च, तुम्हीही नक्की वाचा

  • फोन वारंवार गरम झाल्याने तो हँग होऊ लागतो. अचानक बंद होणं, स्क्रीन रिस्पॉन्स न करणं, फोन रिसिव्ह न करता येणं, यासारख्या अडचणी फोन हँग होण्यास सुरुवात झाली की जाणवू लागतात.
  • कव्हरमुळे फोनमधील हीट बाहेर पडू शकत नाही आणि तो तापतो. त्यामुळे त्याच्या बॅठरीवरही परिणाम होतो.
  • युजर्स मोबाईल कव्हर कधीच काढून स्वच्छ करत नाही. वर्षानुवर्षे मोबाईल कव्हरच्या वापरामुळे पॅनलवर धूळ साचते, त्यामुळे फोनची बॉडी खराब होऊ शकते.

हे काम करा

मोबाईल कव्हर लावल्याने फोनची रचना आणि लूक झाकला जातो. सोप्या शब्दात सांगायचे तर, कव्हरमुळे स्मार्टफोनचे लुक पूर्णपणे लपले जाते. तसेच मोबाईल गरम होणे ही मोठी समस्या आहे, त्यामुळे मोबाईल हा कव्हरशिवाय वापरणेच योग्य ठरेल. तसेच, कव्हरशिवाय, तुमचा फोन अधिक मस्त आणि स्टाइलिश दिसतो.