केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ट्विटरप्रमाणेच इन्स्टाग्रामवरही सक्रीय आहेत. नुकताच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती झुबिन इराणी यांनी शेअर केलेला फोटो रिपोस्ट केला आहे. ‘माझी सगळी गुपिते माहित असलेली व्यक्ती आता एकेक करून ती उघड करत आहे’, अशी कॅप्शन त्यांनी फोटोखाली दिली आहे.

एकता कपूरच्या ‘क्यों की सांस भी कभी…’ या मालिकेत स्मृती इराणी काम करत होत्या. त्यावेळचा हा फोटो आहे. अनेक सेलिब्रिटी गुरूवारी ‘थ्रो बॅक थर्सडे’ या हॅशटॅगने आपल्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करतात. झुबिन यांनीही स्मृती इराणींचा तरुणपणीचा फोटो शेअर केला आहे. एकता कपूरसह त्यांना फॉलो करणाऱ्या हजारो यूजर्सने या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाचा : गरिब घरातील हुशार मुलगा, जपानचा जावई ते बुलेट ट्रेनचा मुख्य सल्लागार! संजीव सिन्हांचा थक्क करणारा प्रवास

स्मृती इराणींचे इन्स्टाग्रामवर ६६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मे महिन्यात स्मृती इराणी यांनी एकता कपूरच्या आग्रहास्तव इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले होते. आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढून त्या कधी-कधी इन्स्टाग्रामवर आपल्या जुन्या आठवणी शेअर करतात.

वाचा : जपानच्या फर्स्ट लेडीविषयीच्या या गोष्टी माहिती आहेत का?

Story img Loader