Smriti Irani Salary For Serial: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्य जनतेला धक्का देत सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. यावरून सध्या सोशल मीडियावर वातावरण तापलेलं असतानाच अचानक सिलेंडरवरून लोक स्मृती इराणी यांनी ट्रोल करू लागले आहेत. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी अलीकडेच IIM उदयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या, यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानावरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंग सुरु केले आहे. याच कार्यक्रमात स्मृती यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा भारतात पहिल्यांदा मॅकडोनाल्ड सुरु झालं होतं तेव्हा मी त्यात काम करत होते असेही त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी यांचा पहिला पगार
स्मृती इराणी यांच्या आयुष्याचा मोठा भाग असलेल्या व मंत्री होण्याआधी त्यांची ओळख असलेल्या मालिकेविषयी सुद्धा त्यांनी या कार्यक्रमात काही आठवणी शेअर केल्या. ‘क्याोंकि सास भी कभी बहू थी’ या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी केलेली तुलसी ही भूमिका केली होती, राजकारणात सक्रिय भूमिका करण्याची इच्छा असल्याने त्यांनी ही मालिका सोडली. या मालिकेत आपल्याला सुरुवातीला १८०० रुपये प्रति एपिसोड मिळत होते असेही त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी यांनी आपल्या सुरुवातीच्या पगाराचा आकडा सांगताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. आता जोपर्यंत गॅस सिलेंडरची किमंत १८०० होत नाही तोपर्यंत तुम्ही काही बोलणार नाही का असा चिमटा सुद्धा काही ट्वीटमधून घेण्यात आला आहे.
हे ही वाचा<<ताज हॉटेलच्या शेफचा पगार ऐकून नितीन गडकरी झाले होते थक्क; एका दिवसाला चक्क…
जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झाले…
दुसरीकडे, याच कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी आपण पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतरचा अनुभव सुद्धा सांगितला . जेव्हा मी पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा मला दिल्लीत खासदार बंगला देण्यात आला होता. या बंगल्याच्या समोरच ताज हॉटेल होते जिथे माझी आई काम करायची. मी तिथे त्या हॉटेलमध्ये जाऊन तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती.