Smriti Irani Instagram Post : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी चांगल्याच चर्चेत आहे. स्मृती इराणी यांनी मासिक पाळी हा काही आजार नाही, त्यामुळे या काळात भरपगारी रजा योजनेची काही गरज नसल्याचे विधान केले होते आणि त्यांच्या वक्तव्यावरुन एकच चर्चा रंगली होती. महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही यावर संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता.
त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांच्या आईसाठी त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत स्मृती इराणी लिहितात, “आई.. तिचा फोटो पोस्ट करण्याचे माझ्याकडे कोणतेही विशेष कारण नाही कारण तिने अगदी सामान्यपणे आम्हाला असामान्य होण्यास शिकवले. आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की एका तरुण राष्ट्राचा भाग म्हणून आपल्याला वृद्ध पालक आहेत, या वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. मी माझ्या महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आशावादी आहेच पण त्याचबरोबर मी अशा पालकांची काळजी घ्यायला तयार आहे ज्यांनी त्यांचे पालकत्व फक्त जन्म देण्यापर्यंतच मर्यादीत ठेवले नाही. प्रत्येकवेळी आपण मुले आपल्या मूडनुसार वागतो पण आपले पालक संयमपणा दाखवता आपला सर्व हट्टीपणा सहन करतात. जसे की वाढलेलं जेवण न खाणे, रात्री बाहेर जाण्यास न विचारणे, चित्रपटांसाठी न विचारणे, एखाद्या ठिकाणी प्रवासासाठी जावेसे वाटणे कारण वर्गातील कोणीतरी त्यांच्या पालकांबरोबर बाहेर जात असतो, आपल्या पालकांचा बजेट आहे की नाही, हा विचार न करता आवडती खेळणी विकत घेणे.”

हेही वाचा : स्मृती इराणी यांच्या मासिक पाळीतील सुट्टीवरील वक्तव्यावर डॉक्टर काय सांगतात? रजेची गरज नक्की कोणाला?

त्या पुढे लिहितात, “तुम्ही हे वाचत असताना कदाचित या क्षणी तुम्ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टींना सामोरे जात असाल पण तुमच्या पालकांना हॅलो म्हणण्यासाठी वेळ काढा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. कारण आपल्याकडे किती काळ आपली आई असणार कुणास ठाऊक #callyourmother”

smritiiraniofficial या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्मृती इराणी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही शंभर टक्के खरे बोलत आहात. मला जेव्हा वेळ मिळतो, मी नेहमी त्यांच्याबरोबर फोनवर बोलत असतो. कारण पालकांना या वयात तुमची गरज असते.” तर एका युजरने लिहिलेय, “मी दररोज माझ्या आईला फोन करते मग मी माझ्या कामात व्यस्त असो किंवा माझ्या बाळाबरोबर व्यस्त असो. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, म्हणून संपर्कात राहण्याचा, बोलण्याचा, भेटण्याचा प्रयत्न करा. कल हो ना हो…”