सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. नेटकऱ्यांना कोणता व्हिडीओ आवडेल सांगता येत नाही. वन्य प्राणी, पक्षी यांच्या हरकती नेटकऱ्यांना सर्वाधिक भावतात. त्यामुळे प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. तर शिकारी आणि दोन प्राण्यांच्या झुंज पाहणं सर्वाधिक पसंत केलं जातं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या सोबत राहणारी आणि वाघाची मावशी म्हणून ख्याती असलेल्या मांजरींचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत दोन मांजरी विषारी सापाचा सामना करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कोब्रा साप उकिरड्यावर फणा काढून बसलेला दिसत आहे. तितक्यात दोन मांजरी तिथे येतात आणि सापाची शिकार करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, एक मांजर समोरून तर एक मांजर सापाच्या मागून सापाला घेरताना दिसत आहे. तर जीव वाचवण्यासाठी साफ त्यांच्यावर फुत्कारताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लाइकचा वर्षाव होत असून नेटकरी सतत प्रतिक्रिया देताना दिसतात.