Video viral: सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅमेऱ्यासमोरच सापाचा हल्ला

असे अनेक धाडसी लोक आहेत जे सापांना घाबरत नाहीत. ते या सापांसोबत इतके फ्रेंडली होतात, की त्यांना साप चावल्यानंतरही ते न घाबरता अगदी सामान्यपणे वागतात. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती हातात साप धरून त्याबद्दल काहीतरी सांगत आहे. दरम्यान,व्हिडिओमध्येच या व्यक्तीच्या हातावर साप हल्ला करतो. त्या व्यक्तीच्या हाताला साप दाताने चावताना दिसतो, यावेळी त्याच्या हातातून रक्तही येत. मात्र या व्यक्तीने अतिशय आरामात सापाची मान पकडून हाताने अगदी अलगद त्याला बाजूला केलं. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती साप चावल्यानंतरही त्यांच्या तावडीतून आपली सुटका कशी करून घ्यायची याबद्दल सांगत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – कशाला भलते प्रयोग? Video पाहून समस्त मिसळ प्रेमींचा संताप; म्हणाले…

हा व्हिडिओ @RajeshIndori नावाच्या अकाउंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.व्हिडिओला आतापर्यंत 6.3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. सर्पदंशाने काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सापांसोबत खेळ करणं काही जणांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. विषारी सापांसोबत रील बनवताना काही तरुणांचा दंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही काही तरुण सापांसोबत खेळ करण्याचा नाद सोडत नाहीत