Spider fight with Snake: सोशल मीडियावर अनेकदा वन्य प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही कधी कोळ्याला सापाची शिकार करताना पाहिलंय का? नक्कीच नसेल. मात्र सोशल मीडियावर सध्या साप आणि कोळी यांच्यामधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे.
कोळीच्या जाळ्यात अडकला साप
या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एका कोळ्याने कारच्या टायरवर आपले जाळे बांधले होते. ज्यामध्ये साप अचानक अडकतो. खरं तर साप या जाळ्यातुन बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते जमत नाही. यानंतर जाळ्यातील कोळी सापाकडे पुढे सरकतो आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडण होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर सापाला हल्ला करण्याची संधी मिळत नाही आणि तो शांत होतो. यानंतर साप या जाळ्यातून कसा बाहेर पडला याबाबत माहिती मिळाली नाही आहे. मात्र हा सापाचा या जाळयात अडकून मृत्यू झाला असेल असा अंदाज अनेकजण बांधत आहेत.
( हे ही वाचा: Video: कान दुखतोय म्हणून ‘ती’ डॉक्टरकडे गेली; तपासणीत कानात कोळी घर बनवताना पाहून डॉक्टरही चक्रावले)
येथे पाहा व्हिडिओ
साप आणि कोळी यांच्यातील भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ जुना आहे, मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो टेक्सासचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत.