सापाला समोर पाहिल्यानंतर भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. रानावनात गवतात भटकणारा साप घराजवळ आल्यावर अनेकांची पळता भूई होते. सापाच्या जवळ जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण करणे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. कारण विषारी सापांच्या दंशाने अनेक जणांच मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरातील दरवाजा उघडा असल्यास गवतात फिरणारा साप आपल्या घरात कधी प्रवेश करतो, याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
जंगल परिसर आणि शेताजवळील घरांमध्ये वनप्राण्यांचा कायम धोका असतो. त्यात पावसाळा आणि जमिनीची उष्णता वाढली की साप बिळातून बाहेर येतात. साप हा शब्द जरी ऐकला की हृदयाचे ठोके चुकतात. सापाच्या एका दंशाने आपण यमराजाकडे पोहोचतो. अशात या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भल्यामोठ्या नागाने झोपलेल्या बाळाला विळखा घातला. हा नाग लांबसडक काळ्या रंगाचा आहे. तो पाळण्याला विळखा घालून पाळण्याच्या दोरीवरुन वेगात वर खाली सरकत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – सख्खा भाऊ पक्का वैरी! भावाला वैतागून वावर विकणे आहे, सोशल मीडियावर पोस्टर तुफान व्हायरल
डॉ. प्रशांत भामरे यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून ज्या शेतकरी मित्रांचे घर शेतशिवारात आहे , त्यानी जरा काळजी घ्यावी, पावसाळ्यात हा धोका जरा जास्तच असतो. असे आवाहन केले आहे