Snake Dance Video: पुंगीच्या तालावर सापाला डोलाताना- नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सर्पमित्र अनेकदा रस्त्यावर आणि परिसरात सापांसह फिरताना दिसतात आणि गारुडी खेळ दाखवताना दिसतात. पण तुम्ही कधी सापाला रॉक म्युझिकवर नाचताना पाहिले आहे का? हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल, पण सध्या सोशल मीडियावर एका सापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये साप ब्लूटूथ स्पीकरवर वाजणाऱ्या म्युझिकवर आनंदाने डोलताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओ पाहिल्यानंतरही तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की, म्युझिकवर साप खरोखरच नाचतोय की नाही? पण अशा म्युझिकवर नाचणारा साप तुम्ही कधी पाहिला नसेल तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा – दही पुरी-पापडी चाटसह ‘हे’ १० पदार्थ आहेत भारतातील सर्वात खराब रेटिंग असलेले स्ट्रीट फूड, येथे पहा संपूर्ण यादी!

एका लाकडी टेबलावर ब्लूटूथ स्पीकर ठेवलेला आहे. स्पीकरजवळ एक बारीक आणि लांब साप बसला आहे. स्पीकरवर रॉक म्युझिक वाजत आहे. साप स्पीकरजवळ जातो आणि म्युझिक ऐकताच नाचू तो लागतो. काही वेळाने, तो त्याचे शरीर वळवतो आणि वेगाने हालचाल करू लागतो आणि यासह व्हिडिओ संपतो.

हेही वाचा – ‘हे’ आहेत पुण्यातील प्रसिद्ध वडापाव! खवय्या पुणेकरांचे आवडते वडापावचे ठिकाण कोणते? जाणून घ्या

सापाचा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. काही लोक याला ‘डीजे स्नेक’ म्हणत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर kohtshoww नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake dancing on rock music near bluetooth speaker viral video snk