मनुष्य आणि प्राणी यांचं नातं फार जुनं आहे. बऱ्याच काळापासून मनुष्य आणि प्राणी एकमेकांसोबत राहतात. पण असेही काही प्राणी आहेत ज्यांच्यापासून मानव दूर राहणंच पसंत करतो. वन्य प्राणी आणि विषारी प्राणी मनुष्यासाठी सर्वात धोकादायक आहेत. विशेषत: सापांबद्दल बोलायचं झालं तर केवळ पाहिलं तरी भल्या भल्याची दमछाक होते. माणसाने सापांपासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कल्पना करा की, जर आकाशातून सापांचा पाऊस पडला तर… तेही गजबजलेल्या भागात? अंगावर शहारे आले असतील ना…असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर कदाचित तुम्हाला विश्वास होणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. यामध्ये वर्दळ असलेल्या रस्त्यावरून वर आकाशात एक साप हालचाल करताना दिसून येतोय. सुरूवातीला हा व्हिडीओ पाहिला तर असं वाटतं की हा साप आकाशात तरंगतोय. पण प्रत्यक्षात हा साप आकाशात नव्हे तर रस्त्यावरून गेलेल्या एका तारेवर साप लटकलेला दिसून येतोय. तारेला विळखा घालून हा साप हाचलाच करताना दिसून येतोय. हे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. लोकांची नजर तारेला लटकलेल्या सापावर पडताच सर्व जण सैरावैरा पळू लागले. इतका महाकाय साप दिसला म्हणजे जीव गेल्यातच जमा नाही का… आरडाओरडा करत नागरिक जिथे जागा मिळेल तिथे पळू लागले आणि रस्ता मोकळा केला.

त्यानंतर रस्त्यावरील लोक घाबरून या तारेला विळखा घातलेल्या सापाकडे डोकावून बघत होते. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते, तर विचार करा अचानक आपल्या डोक्यावर तारेला साप लटकत असल्याचं पाहून लोकांची काय अवस्था झाली असेल.

बराच वेळ हा साप तारेला विळखा घालून राहिल्यानंतर अचानक हा साप धापकन रस्त्यावर पडला. साप रस्त्यावर जसाच पडला तशी लोकांनी जोरजोराने आरडाओरड करत पळू लागले. लोकांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. “आकाशातून साप पडला” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला. मात्र प्रत्यक्षात हा साप आकाशातून नव्हे तर रस्त्यावरच्या तारेला लटकलेला होता. साप पाहताच तिथल्या लोकांनी बचाव पथकाला माहिती दिली. बचाव पथकाने येऊन हा साप पकडला.

आणखी वाचा : Bride Dance Video : स्वतःच्याच लग्नात नवरीने केला इतका जबरदस्त डान्स की लोक जोरजोराने ओरडू लागले…

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जुळ्या बहिणींनी रिक्रिएट केलं ‘Squid Game’ मधलं पिंक सोल्जर गाणं

हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा व्हायरल व्हिडीओ ‘ViralHog’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ९९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.