सापाचे तुम्ही आजवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी बाईक, कधी कार, कधी चप्पल, कधी सोफा, कधी किचन अशा किती तरी ठिकाणी साप लपून बसल्याची प्रकरण समोर आली आहेत. पण आता तर चक्क चालू पंख्यामध्ये हा साप बसला होता. साप म्हटलं तरी घाम फुटतो. साप समोर दिसला तर तोंडाची बोबडीच वळते. विचार हाच साप तुमच्या अंगावर पडला तर…नुसता विचार करुनही अंगावर काटा येतो. मात्र एक व्यक्तीच्या खरोखर अंगावर हा साप पडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फिरत्या पंख्यावर एक साप बसला आहे. या पंख्याभोवती हा विषारी साप गोल गोल फिरत आहे, दरम्यान फिरत्या पंख्याच्या पातींमध्येही हा साप मध्ये मध्ये अडकत आहे. याचवेळी एक व्यक्ती या सापाचा व्हिडीओ काढत होता. तेवढ्यात पंख्यावरचा साप थेट त्या माणसाच्या अंगावर पडला. यानंतर हा व्यक्ती सैरभैर पळू लागला. यानंतर या सापाने त्या व्यक्तीला काही इजा केली की नाही याबद्दल माहिची मिळाली नाही. हा भयानाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video : ‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटगृहात हाणामारी, हनुमानासाठी राखीव खुर्चीवर बसला म्हणून थेट…

हा व्हिडीओ arabbird नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले आहेत. या व्हिडीओला यूजर्सकडून पसंती मिळतं असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ पाहिला जातो आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake fell on man from rooftop of house snake attack shocking video viral on social media srk