Viral video: साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल. एकमेकांचे कट्टर शत्रु असणारे हे दोघेही जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाईपर्यंत ते एकमेकांना सोडत नाही. मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि सापाची अशीच कडवी झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील दोघांच्या भांडणाचाच आहे. यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच थरार साप आणि मुंगूस यांच्यामध्ये पाहायला मिळाला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सापानं पहिला हल्ला केला. त्यानं फणा काढून मुंगूसाला दंश केला. पण मुंगूसाला सापाच्या विषानं काहीच फरक पडत नाही. त्यानं दुसऱ्याच क्षणी तो वार झेलला आणि एका झटक्यात सापाच्या तोंडाचा चावा घेऊन खेळ संपवला. लक्षवेधी बाब म्हणजे केवळ ५ सेकंदात शेवटी त्यानं एका विषारी सापाचा गेम केला. मुंगूस हा भयंकर मोठा शिकारी आहे. तो सहसा विनाकारण शिकार करत नाही, पण सापाला ते मारतात कारण साप हे मुंगूसच्या आहारातील मुख्य अन्न आहे. साप मनुष्यासहित अनेक प्राण्यांना पाणी पाजतो, तोच साप मुंगुसासमोर नांगी टाकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच

मुंगूस हा विषारी साप, विशेषत: कोब्रा यांच्याशी लढण्याच्या आणि मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. एकमेकांचे कट्टर वैरी असणारे मुंगूस आणि साप सहसा जीव जाईपर्यंत एकमेकांना सोडत नाही. साप दिसताच मुंगूस त्याच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही. भारतीय राखाडी मुंगूस हा सर्वात सुप्रसिद्ध सापांच्या शिकाऱ्यांपैकी एक आहे, जो जगातील सर्वात प्राणघातक सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्राला मारण्यासाठी ओळखला जातो. हे मुंगूस या सापांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात शिकार करतात आणि त्यांना मारतात, विषाच्या पिशव्या खातात. मुंगूस विविध प्रकारचे साप मारतात, परंतु कोब्रा या यादीत खूप वरचे आहेत. मुंगूस मोठ्या प्रमाणात विषारी सापांच्या विषापासून रोगप्रतिकारक असतात. माणसांमध्ये शत्रुत्त्व असणे सामान्य आहे, जे त्यांच्या वागण्याबोलण्यामुळे होते. मात्र, काही प्राण्यांमध्येही भयंकर वैर असते आणि ते निसर्गानेच निर्माण केले असते. साप आणि मुंगूस यांच्यातील वैर हे असेच आहे.

Story img Loader