Snake Trending Video: मनुष्यवस्तीत असो किंवा जंगलात. कुठेही साप दिसला तरी आपण ‘बापरे’ अशीच प्रतिक्रिया देतो. प्रत्येकाच्या मनात सापाविषयी भयंकर भीती आहे. त्यामुळे दूर अंतरावर जरी साप दिसला तरी माणसाला धडकी भरते. काहींना तर व्हिडिओमध्ये साप पाहणे देखील नकोसे वाटते. प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओही अनेकदा इंटरनेटवर दिसतात, जे हृदय पिळवटून टाकणारे असतात. सध्या अशा एका सापानं केलेल्या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कावळ्याला जबड्यात पकडून केली शिकार –

व्हायरल होत असलेल्या या धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लांबलचक साप हवेत लटकून कावळ्याला आपली शिकार बनवत आहे. हा साप विजेच्या खांबाला लटकत असून त्यानं जबड्यात कावळा पकडला आहे. सापाची पकड इतकी मजबूत असते की कावळ्याची अवस्था बिकट होते… कावळ्याची अशी अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. साप हळूहळू कावळ्याला पूर्णपणे गुंडाळतो खेचतो आणि घट्ट पकडतो. हे संपूर्ण दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्सची थक्क झाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – इंटरव्यूहमध्ये iPhone न ओळखल्यामुळे नोकरी गमावली, पठ्ठ्यानं सुरू केली स्वत:चीच कंपनी

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर @memesworld1191 नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी त्याला लाइक केले आहे. हे पाहून काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काहींनी असा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले.