Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात दोन अजगर साप चक्क घराच्या छतात लपून बसला होता. महिलेला सारखा आवाज यायचा त्यामुळे तिनं एक दिवस तपासलं तर दोन महाकाय अजगर लपून बसले होते. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला टेबल उभी आहे आणि घराच्या छतात लपून बसलेला साप काढत आहे. यावेळी ती बिलकुल घाबरलेली नाहीये, ती बिंधास्त छतात हात घालून सापाच्या तोंडाचा अंदाज घेऊन हळू हळू साप बाहेर काढत आहे. याठिकाणी एक नाहीतर दोन महाकाय अजगर दिसत आहे. तरीही ही तरुणी त्या दोन्ही अजगरांना तिच्या दोन्ही हातात पकडून छतातून संपूर्ण ताकदीने बाहेर काढत आहे. अखेर ती दोन्ही सापांना बाहेर काढते आणि टेबलवरुन उतरते.
अंगावर काटा आणणारा VIDEO
तरुणीने दाखवलेल्याधाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत. तरुणीने आवाज आला म्हणून पाहणी केली आणि सापांना बाहेर काढलं. नाहीतर मोठा अपघात झाला असता. अजगर किती भयंकर साप आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> याला म्हणतात कर्माचे फळ! विक्रेत्याला फसवताना स्वत:चीच झाली फसवणूक VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ nathanslawnsandgardens या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.