Viral video: गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. लग्नापूर्वी अनेक जोडपे एकत्र येत फोटो आणि व्हिडिओसेशन करण्यास प्राधान्य देत आहे. पूर्वी लग्नात फोटोंची हौस भागवून घेतली जात होती. आणि आता लग्नाआधीच म्हणजे प्री-वेडिंग शूटचं फॅड आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर एक विचित्र प्री-वेडिंग शूट व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. आपला लग्न सोहळा लक्षात राहावा यासाठी लोकं प्री वेडिंग शूट मध्ये नव्या लोकेशन्ससोबतच काही वेगळ्या थीम्सचाही शोध घेतात. सध्या असेच एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. एक कपल जे अंधारात प्री-वेडिंग शूट करत होतं. कपल एकमेकांच्या मिठीत होतं. त्याचवेळी त्या दोघांमधून कुणीतरी गेलं. जे पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नाच्या या आठवणी वेगवेगळ्या प्रकारे कॅमेऱ्यात कैद करण्याचा जोडप्याचा प्रयत्न असतो. लग्नाआधी केल्या जाणाऱ्या या फोटोशूटसाठी काही लोक जंगलात जातात, काही लोक डोंगरावर जातात, कोणी किल्ल्यावर जातं, तर कोणी भर समुद्रात बोटीवर फोटोशूट करतं. असंच हे कपलसुद्धा पाण्यात फोटोशूट करत होतं. यावेळी कपलंन त्यांच्या शूटसाठी रात्रीची वेळ निवडली. आणि तेही पाण्याचं ठिकाण. पाण्यात बसून या कपलनं एकमेकांना मिठी मारली आहे. आजूबाजूला फोटोग्राफरही कपलचे फोटो काढण्यात व्यस्थ आहेत. यावेळी पाण्यात ड्राय आइस टाकलं जाते ज्यामुळे पाण्यात धूर पसरतो. याचवेळी काहीतरी पाण्यातून गेल्याचं नवरदेवाला दिसत आणि तो सर्वांना सावध करतो. पण नेमकं काय होतं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर हा व्हिडीओ पाहाच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फोटोग्राफर सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि साप कुठून कसा जातोय हे सांगत आहे. तेवढ्यात साप हळूहळू कपलच्या जवळ जातं. अगदी कपलच्या मधून तो जातो. इथंच नवरी किंचाळते. त्यानंर सुदैवानं साप तिथून निघून जातो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हास्यजत्रेतील ‘अवली लवली कोहली…’ नंतर ‘आम्ही बाई सुना…’ गाणं व्हायरल; तुम्ही VIDEO पाहिला का?

लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवी प्रथा सध्या रूढ होऊ लागली आहे. लग्नाच्या आधी होणारे नवरा-नवरी फोटोशूट करून घेतात. मात्र हे विचित्र फोटोशूट पाहून सर्पमित्र चांगलेच संतापले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हजारोवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तर नेटकरीही फोटो पाहून संतापले असून संतप्त प्रतिक्रिया देत आहेत