Snake in Train Viral Video : साप म्हटलं की फक्त भीतीनेच आपल्या अंगावर शहारे येतात. कधी-कधी साप अशा ठिकाणी येतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. अशावेळी किती भिती वाटते हे काय सांगायलो नको. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. झारखंडवरून गोव्याला जाणाऱ्या वास्को-द-गामा या एक्स्प्रेसच्या सेकंड एसी कोचमध्ये एक साप आढळून आला. अचानक साप प्रवाशाच्या सीटजवळ आढळून आल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. यासंदर्भातील एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

झारखंडवरून वास्को-द-गामा ही आठवड्याला धावणारी एक्स्प्रेस गोव्याकडे जात होती. यावेळी या एक्स्प्रेसच्या एसी सेकंड एसी डब्यात प्रवाशांना एक जिवंत साप दिसला. साप दिसताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. काही प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे सेकंड एसी डब्यात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात

प्रवशांनी गोंधळ केल्यानंतर आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर एका व्यक्तीच्या मदतीने त्या सापाला आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांनी एका चादरीमध्ये गुंडाळून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ यावेळी काही प्रवाशांनी रेकॉर्ड केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंकित कुमार सिन्हा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

दरम्यान, झारखंडवरून वास्को-द-गामा ही आठवड्याला धावणारी एक्स्प्रेस गोव्याकडे जात असताना एक्स्प्रेसच्या सेकंड एसी डब्यात प्रवाशांना एक जिवंत साप आढळून झालेल्या गोंधळानंतर रेल्वे प्रशासनाला याची तक्रार प्राप्त झाली होती. तसेच योग्य ते कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. तसेच या घटनेचा व्हिडीओ अंकित कुमार सिन्हा यांनी एक्सवर शेअर केला होता, त्यांनीही योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तक्रार स्वीकारण्यात आल्याचं रांची रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.