सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओने लोकांची दातखिळी बसली आहे. ज्यामध्ये एका तरुणीच्या कानात चक्क साप गेला आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, या व्हिडीओमुळे लोक आता आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला जेव्हा तिच्या कानात काहीतरी शिरलं असे कळलं, तसंच ती डॉक्टरांकडे पळत गेली. ज्यानंतर डॉक्टरांना दिसलं की, या तरुणीच्या कानात साप गेला आहे. ते पाहून डॉक्टरही घाबरले. परंतु त्यांनी धिरानं काम केलं. डॉक्टरांनी तरुणीला बसवून हातात ग्लोज घातले आणि लहान चिमट्याने सापाला बाहेर काढलं. ही घटना नक्की कुठली आहे, हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ शिल्पा रॉय यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचाच असलेला हा व्हिडीओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय.

तरुणीच्या कानात शिरलेला हा छोटा साप पिवळ्या रंगाचा आणि अंगावर चट्टे असलेला साप आहे. तिच्या कानातून हळूच आपलं तोंड बाहेर काढत आहे, असे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

Viral : हाताचे पंजे नसतानाही चिमुकला काढतोय अप्रतिम पेंटिंग, पाहा हा प्रेरणादायी व्हिडिओ