केरळचे लोकप्रिय सर्पमित्र वावा सुरेश सापाने चावा घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी झगडत होते. परंतु ते आता धोक्याबाहेर आहेत. त्यांना गुरुवार ३ जानेवारीला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक टी के जयकुमार यांनी सांगितले की, सुरेश यांनी स्वतःहून श्वास घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. तसेच पुढील २ दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
सुरेश यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष वैद्यकीय पथक स्थापन केले आहे. केरळमधील प्रत्येक घरातील लोक सुरेश यांना ओळखतात. त्यांनी आतापर्यंत ५०,००० पेक्षा जास्त सरपटणाऱ्या जीवांना वाचवले आहे. नॅशनल जिओग्राफिक आणि अॅनिमल प्लॅनेट चॅनेलनेही त्यांच्यावर चित्रीकरण केले आहे. केरळमध्ये सुरेश यांना ‘स्नेक मॅन ऑफ केरळ’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत १९० पेक्षा अधिक किंग कोब्राचे प्राण वाचवले आहेत. ३१ जानेवारी रोजी कोट्टायम येथील मानवी वस्तीतून सापाची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना ४८ वर्षीय सुरेश यांना कोब्राने चावा घेतला होता.
एकाच दिवशी लग्नही आणि मृत्यूही; काळजाला भिडणारी दोन भावांची गोष्ट
सुरेश यांना असा चावला साप
वावा सुरेश सोमवारी ३१ जानेवारीला कोट्टायम गावात साप पकडून त्याला जंगलात सोडत होते. जेव्हा ते सापाला पकडून पिशवीमध्ये ठेवत होते तेव्हा साप आक्रमक झाला आणि त्याने सुरेश यांच्या मांडीचा चावा घेतला. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी शूट केला आहे. स्थानिकांनी सुरेश यांना एका खासगी रुग्णालयात नेले. बेशुद्ध होण्याआधीच सुरेश यांनी साप पिशवीत ठेवला.
लाइव्ह डिबेटमध्येच सुरु झाली मारामारी! भांडणाचा Video Viral
आतापर्यंत सुरेश यांना अनेक साप चावले आहेत
हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सुरेश यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणले गेले तेव्हा ते बेशुद्ध होते. त्यांना अँटी-वॅनम म्हणजेच विषविरोधी औषध दिले जात आहे. साप पकडण्यासाठी सुरेश संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत. एखाद्याला धोकादायक साप दिसताच ते सुरेश सुरेश यांना फोन करतात. सुरेश लवकरच तिथे हजर होऊन सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात. त्यांनी एका खाजगी टीव्ही चॅनलवर त्यांच्या साप बचाव मोहिमेवर आधारित एक कार्यक्रमही सुरू केला आहे. एका मुलाखतीत सुरेशने सांगितले की, आतापर्यंत त्यांना डझनभर साप चावले आहेत. २०२० साली त्यांना पिट वाइपरने चावा घेतला, त्यानंतर त्यांना तिरुअनंतपुरममधील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये एक आठवडा उपचार घ्यावे लागले.
सुरेश यांना सापांचा देवदूत असे म्हटले जाते. भटक्या सापांना वाचवण्याचा त्यांचा ध्यास आहे. सुरेश साप पकडण्याच्या बदल्यात कोणाकडूनही पैसे घेत नाही. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन २०१२ मध्ये केरळचे मंत्री केबी गणेश कुमार यांनी सुरेश यांना स्नेक पार्कमध्ये सरकारी नोकरीची ऑफर दिली, पण त्यांनी ती नाकारली. सुरेश यांनी सांगितले, नोकरी करताना ते समाजाला हवी तशी मदत करू शकत नाही. पश्चिम घाटात सापांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळेच सुरेश यांनी सापांना वाचवणे हे आपले ध्येय बनवले आहे.