Snake Vs Frog Video: रस्त्यावर फिरणाऱ्या सापांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. त्यामागचं कारणंही तितकच भन्नाट असतं. नागासारख्या विषारी सापासोबत खेळ करू व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसते. सापांसोबत खेळ करून इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल करण्यात काही जणांना भलताच आनंद होत असतो. कारण सापांचे व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्याही सोशल मीडियावर लक्षणीय आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. भरधाव वेगानं साप एका बेडकाजवळ येतो आणि तितक्यात बेडूकही त्याला जशास तसं उत्तर देत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

….अन् बेडकानेही सापाच्या नाकी नऊ आणले

रस्त्यावरून जाणाऱ्या एका सापाने त्याच्या भक्ष बेडकाला पाहताच गिअर बदलला. वाऱ्याच्या वेगासारखा साप बेडकाजवळ गेला. पण बेडकानेही त्याला जशास तसं उत्तर दिलं. साप बेडकाची शिकार करण्याच्या तयारीत असतानाच बेडूकही चपळ निघाला. जस जसा साप बेडकाच्या जवळ यायचा, बेडूकही उड्या मारून त्याची खिल्ली उडवत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सापाकडे वेगानं धावण्याची क्षमता असली, तरी बेडूकही तितकाच चालाख आणि चपळ निघाला. साप डसण्याच्या तयारीत असला की, बेडूक दोन तीन उड्या मारत पुन्हा त्याला आव्हान देतो. या दोघांचा खेळ असाच सुरु राहतो अन् शेवटी कोण जिंकतो ते पाहा या व्हिडीओत

इथे पाहा व्हिडीओ

सापा भुकेने व्याकूळ झाल्यावर शेतातीत बेडकाची शिकार करण्यासाठी मोठी रणनीती आखतो. पण एका सापाला भर रस्त्यातच बेडूक दिसतो आणि लगेच तो गिअर बदलतो. साप वेगानं बेडकाजवळ येतो. बेडकाला साप आपल्याजवळ आल्याचं कळताच तो काही सेकंदातच उड्या मारत रस्त्याच्या बाजूला जातो. पण सापंही हार मानत नाही. तो त्या बेडकाचा पाठलाग करतच राहतो. पण काही अंतरावर गेल्यावर बेडूक दिसेनासा होतो आणि सापाला त्याचा भक्ष मिळत नाही. हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.