Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक अजगर साप थेट एका कपड्याच्या दुकानात लपून बसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात साप दिसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र एवढा मोठा अजगर दुकानात कसा आला? असा सवाल सगळे करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लालकुर्ती पोलीस स्टेशन हद्दीतील बेगमपुल येथील पेंठ येथील रामा सूटच्या दुकानात कपड्यांवर एक अजगर येताना दिसला. हा प्रकार पाहताच त्यांनी आरडाओरड करत तेथून पळ काढला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर टीमने अजगराला सुखरूप पकडले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वडिलांच्याच राज्यात मुलगी राज्य करते; बाप-लेकीच्या नात्याचा सुंदर VIDEO होतोय व्हायरल

वननिरीक्षक मोहन सिंग यांनी दिली माहिती

वननिरीक्षक मोहन सिंग यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या अजगराची लांबी सुमारे १२ ते १४ फूट होती. जवळच अबू नाला असल्याने तेथून अजगर येण्याची शक्यता आहे. अजगराची सुटका करून जंगलात सोडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake rescue video in meerut goes viral rescue team helped to get it out watch snake viral video on social media srk
Show comments