Snake in Car: सापांच्या अनेक प्रजाती जगभरात आढळतात. विषारी साप चावल्यामुळे रोज कोणाचा तरी मृत्यू होतो, अशा परिस्थितीत जेव्हा सापाचा सामना करावा लागतो तेव्हा प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी सापांना मारतो. किंवा काहीजण सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडतात. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. सापाचं नाव घेतलं तरी अंगावर शहारा येतो. सर्पमित्र सोडले तर सापाची सगळ्यांना भीती वाटते. तरीदेखील सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडिओ पाहिलं असेल ज्यामध्ये शूज, खुर्च्यांमध्ये, हेल्मेटमध्ये साप लपलेले असतात. अनेकदा तर कार, स्कूटींमध्येही साप आढळल्याचे व्हायरल व्हिडिओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कारच्या डॅशबोर्डमध्ये लपला होता साप –
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्रिटनमधील एका व्यक्तीने आपल्या कारमध्ये लपलेला साप पकडला आहे. गाडीच्या डॅशबोर्डमध्ये हा साप लपून बसला होता. ही व्यक्ती गाडी चालवत होती, अचानक काहीतरी हालचाल झाल्याचं तिला जाणवलं आणि त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर चेक केल्यानंतर भलामोठा साप गाडीच्या डॅशबोर्डमध्ये लपून बसला होता. यानंतर त्यांनी गाडी बंद केली आणि रेस्क्यू टीमला याची माहिती दिली. काही वेळात रेस्क्यू टीम दाखल झाली आणि त्यांनी गाडीच्या डॅशबोर्डमध्ये लपलेला साप बाहेर काढला.
पाहा फोटो –
हेही वाचा – Video viral: वर्क फॉर्म थिएटर; तरुणानं थिएटरमध्येच उघडला लॅपटॉप! नेटकरी म्हणतात, जेव्हा दोन्ही…
हे फोटो फेसबूकवर शेअर करण्यात आले आहेत. अनेकांनी या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून सतर्क राहण्याचं आवाहनही अनेकजण करत आहेत.