Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महिलेनी अंगावर घातलेल्या गाऊनच्या आत साप अडकला आहे आणि ही महिला जोरजोराने ओरडत रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. (snake stuck inside gown of a woman she cries shocking video goes viral)
अंगावर घातलेल्या गाऊनच्या आत अडकला साप, महिलेनी केला एकच दंगा,
साप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. सापापासून प्रत्येक जण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा साप मानवी वस्तीत आढळल्यावर एकच खळबळ उडते. असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण तुम्ही कधी कल्पना केली की एखाद्याच्या कपड्यात साप अडकला असेल तर.. खरं तर ही कल्पनाही करू शकत नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे प्रत्यक्षात दिसून येत आहे. एका महिलेनी अंगावर घातलेल्या गाऊनच्या आत चक्क साप अडकलेला दिसत आहे आणि ती महिला भीतीपोटी ओरडताना दिसत आहे. तिला रडू येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सर्पमित्र अत्यंत हुशारीने त्या महिलेच्या गाऊनमधील साप बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DGXXL4rsgLo/?igsh=ZDBucHJodzZjeXNk
tumihaasleaami147 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी असते तर बेशुद्ध झाले असते” तर एका युजरने लिहिलेय, “मला खूप भीती वाटते” काही युजर्सनी लिहिलेय, “हा साप प्लास्टिकचा आहे” जवळपास ९२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक्स केला आहे.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सापाशी संबंधित अनेक व्हिडीओ सर्पमित्र त्यांच्या अकाउंटवरून शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओच्या अनेल लोक लाइक कमेंट्सचा वर्षाव करतात.