Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. सापाच्या नादाला लागलं की तुम्हाला दंश केलाच म्हणू समजा. सामान्यत: या सापांच्या आहारात अळी, अळ्या आणि झुरळे असतात तसेच जवळजवळ सर्व प्रकारचे लहान कीटक साप खातात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्ष देखील गिळू शकतात. मात्र तुम्ही कधी सापाला स्वतःलाच जिवंत गिळताना पाहिलंय का? नाही ना..मग हा व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
याचं कारणही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. कॅप्शननुसार, ‘साप हा थंड रक्त असलेला प्राणी आहे. हवामानातील बदलांमुळे त्याला त्याच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यात अडचण येते. वाढत्या उन्हात सापांना थंडावा मिळण्यासाठी घाम येत नाही.’
कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे की, ‘घाम न आल्यानं सापांचं चयापचय वाढतं, ज्यामुळे त्यांना खूप भूक लागते. अशावेळी साप पहिल्यांदा जे त्याला दिसतं तेच तो खाऊ लागतो. आपली शेपटीदेखील तो सोडत नाही. याशिवाय, त्वचेला इजा आणि दृष्टी कमी होणं यासारख्या परिस्थितींमुळे देखील ते त्यांच्या शेपट्या खाऊ लागतात आणि स्वतःवर हल्ला करू शकतात.’ कदाचित ही दोन कारणं आहेत, ज्यामुळे हा साप स्वतःला गिळण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरं कारण असं असू शकतं, की त्यांचं पोट पूर्णपणे भरलेलं नाही आणि ते स्वतःला शिकार समजतात आणि स्वतःलाच खाऊ लागतात. अगदी छोट्या जागेत असतानाही ते गोंधळून जातात आणि शेपूट गिळायला लागतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पोलिसांतील माणूस हरवलाय? पोलीस कॉन्स्टेबलला वरिष्ठ अधिकाऱ्याने जेवताना उठवलं; संतापजनक VIDEO व्हायरल
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @BaliChannel नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हंटलंय, “बापरे हे खूप डेंजर आहे.” दुसरा म्हणतो,” हे पहिल्यांदाच ऐकलं”