सध्या सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यात होळीचा सण साजरा करत असताना एक विचित्र घटना समोर आली आहे. ती म्हणजे छिंदवाडा येथील जाम सांवली हनुमान मंदिरात होळीच्या सणानिमित्त महाआरती सुरु असताना अचानक एक साप मंदिरात शिरतो. त्या सापाला एक महिला न घाबरता पकडते आणि साप हातात घेऊन ती चक्क नाचायला लागते. दया घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- चार वर्षाच्या चिमुरडीला बैलाने चिरडलं, हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे CCTV फुटेज Viral
या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महत्वाचं म्हणजे सापाने या महिलेला कोणतीही इजा केली नाही आणि तो काही वेळाने शांतपणे तिचा हातातून गेल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरतीच्या वेळी महिलेने हातात गुंडाळलेल्या सापाचा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
काही लोकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, अशा घटना दैवी शक्तीच्या उपस्थितीत घडतात आणि ते दैवी हस्तक्षेपाचे लक्षण असू शकते असं म्हणत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, एक महिला दर्शन हनुमान मंदिरात आरती सुरु असताना एक महिला सापाला हातात घेऊन फिरवताना दिसत आहे. जे पाहून मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व महिला देखील आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेत. शिवाय ही महिला मोठ्या उत्साहाने नाचताना दिसत. @indiatvyogendra नावाच्या ट्विटर अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकजण हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत.