Snakes Drinking Water video: कधी कधी सोशल मीडियात असे व्हिडीओज व्हायरल होता जे बघून आश्चर्याचा धक्का तर बसतोच सोबतच असे व्हिडीओ आपण पुन्हा पुन्हा बघतो. असाच एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात चक्क एक व्यक्ती सापाला पाणी पाजताना दिसतोय. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियात तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा नक्की पाहिला नसेल. हीच या व्हिडीओची खासियत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोब्रा सापाचे एक खास वैशिष्ट सांगतले जाते ते असे की, एकदा का किंग कोब्रा डसला की तो डसलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाच म्हणून समजा. अर्थात वेळीच उपचार घेतले तर रुग्ण वाचण्याची शक्यात कैकपटीने अधिक असते असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे विषारी साप म्हटले की काही प्रमाणात लोकांचे डोळे विस्फारणे सहाजिकच आहे. पण, अशा या विषारी सापाला जर कोणी पाणी पाजले तर? आश्चर्य वाटेल की नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले तरी असे घडले आहे खरे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक भलताच लांब किंग कोबरा जमीनीवर पसरला आहे. एक व्यक्ती आपल्या हातांनी त्याला पाठिमागे पकडले आहे. दुसरा व्यक्ती आपल्या हातालील बॉटलने त्याला पाणी पाजतो आहे. मात्र, सापाला पाणी पाजणाऱ्या या व्यक्ती काहीशा घाबरलेल्या दिसतात हे नक्की. या दृश्याचा काही लोक व्हिडिओही बनवत असल्याचे दिसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! मधमाशांचा लग्न समारंभात हल्ला; तीन जण ICU मध्ये दाखल, थरारक VIDEO व्हायरल

काही लोक या व्हिडीओवर टीका करत आहेत तर काही लोक क्यूट म्हणत आहेत. तर काही लोक या सापाबाबतची माहिती विचारत आहेत. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तर अनेकजण सापाबाबत चर्चाही करत आहेत.

याआधीही काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते ज्यात एक व्यक्ती कोब्रा सापाला बॉटलने पाणी पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालाय. तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक व्यक्ती उन्हाने वैतागलेल्या कोब्रा सापाची आंघोळ घालताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snakes drinking water in betul madhya pradesh shocking video viral on social media srk