आजची पीढी ही स्मार्टफोनच्या अधीन गेली आहे. पालक सर्रास छोट्या मुलांच्या हातात मोबाइल देतात. काही मुलं तासन् तास मोबाइलवर गेम्स खेळतात, टीव्ही पाहतात. हा अतिरेक इतका वाढतो की खुद्द पालकही कधी कधी मुलांच्या वागण्यापुढे हतबल होतात. मात्र स्नॅपचॅटचा मुख्य कार्यकारी अधिकारी इवान स्पीगलनं आपल्या मुलासाठी काही खास नियम तयार केला आहे. मुलानं इंटरनेट, मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटरच्या अधीन जाऊ नये यासाठी इवाननं आपल्या सात वर्षाच्या मुलासाठी या गोष्टींच्या मर्यादीत वापरासाठी नियम घालून दिला आहे.
आठवड्यातून मुलानं फक्त ९० मिनिटेच इंटरनेट, मोबाईल वापरावा असा नियम त्यानं फ्लाएनपुढे ठेवला आहे. आठवड्यातून एकदा ९० मिनिटांसाठी तो कोणत्याही एका गोष्टीचा वापर करुन शकतो. जगभरातील तरुण पीढी २८ वर्षीय इवाननं तयार केलेल्या स्नॅपचॅट अॅपच्या पूर्णपणे अधीन गेली आहे. असं असतानं इवाननं स्वत:च्या मुलावर घालतेली बंधन ही प्रत्येक पालकानं विचार करण्यासारखीच आहेत. २०१७ मध्ये इवाननं घटस्फोटीत मॉडेल मिरांडा मे केरशी लग्न केलं. मिरांडाला ७ वर्षांचा मुलगा आहे. या मुलाचं उत्तम संगोपन व्हावं यासाठी इवान नेहमीच प्रयत्नशील असतो.
आपल्या मुलाला इंटरनेट मोबाईलच्या अधीन जाण्यासापासून रोखणारा हा काही पहिलाच अब्जाधीश नाही. जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल गेट्सनंही आपल्या मुलांसाठी मोबाईल आणि इंटरनेट वापराबद्दल काही खास नियम घालून दिले होते.