गध्देपंचविशीत (म्हणजे २५ वर्षांचे झाल्यावर) लाईफ छान असतं. नोकरी बिकरी असते,अंगात दम असतो आणि जग जिंकण्याची इच्छा असते. पण आपल्यापैकी ९९ टक्के लोक या काळात गुलछबूगिरी करण्यात घालवण्यात.
आता भेटा २६ वर्षांच्या एवन स्पीगल आणि त्याच्या गर्लफ्रेंडला
त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे मिरँडा कर. ती एक सुपरमाॅडेल आहे.
पण थांबा, ही स्टोरी तिच्याविषयी नाहीये तर तिच्या बाॅयफ्रेंडविषयी आहे.
२६ वर्षांचा एवन स्पीगल जगातला सर्वात लहान वयाचा अब्जाधीश झालाय. आता यात काय नवल तुम्ही म्हणाल. पण एवन स्पीगल हा ‘स्नॅपचॅट’ या चॅटिंग अॅपचा निर्माता आहे.
भारत ‘व्हाॅट्सअॅप’ची भूमी आहे. ‘टांगा पल्टी संघटने’पासून ते ‘आॅल इंडिया क्रिकेट क्लब आॅफ रामनगर’ पर्यंत सगळ्या ग्रुपमध्ये एकमेकांना खेचणाऱ्यांचं ते अढळ स्थान आहे. चांगल्या गप्पा मारणाऱ्यांसोबतच खरेपणाची शपथ घेत मेसेज फाॅरवर्ड करण्यासाठी ब्लॅकमेल करणाऱ्यांपर्यंत सगळे इथे सापडतात. पण व्हाॅट्सअॅपला आता स्नॅपचॅटचीही स्पर्धा होऊ लागली आहे.
भारतात वीस वर्षांपासून पुढच्या वयोगटातल्यांमध्ये व्हाॅट्सअॅप फेमस असलं तरी टीनएजर्समध्ये स्नॅपचॅट हळूहळू प्रसिध्द असल्याचं समोर येतंय. याच स्नॅपचॅटचा निर्माता आहे एवन स्पीगल.
स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी या जगातल्या टाॅप ५ युनिव्हर्सिटीज् पैकी एक असणाऱ्या युनिव्हर्सिटीत शिकणारा एवन एका साॅफ्टवेअर कंपनीत इंटर्नशिप करत होता. स्टॅनफर्डमध्ये त्याची भेट बाॅबी मर्फी याच्याशी झाली आणि या दोघांनी ‘स्नॅपचॅट’ हे अॅप बनवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेमध्ये हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपच्या लोकप्रियतेची दखल फेसबुकलाही घ्यावी लागली आणि २०१३ मध्ये मार्क झकरबर्गने ३ अब्ज डाॅलर्स (सुमारे २१० अब्ज रूपये!) देत ‘स्नॅपचॅट’ विकत घेण्याचा एवनपुढे प्रस्ताव ठेवला. पण आपली कंपनी यापुढेही वाढण्याची शक्यता असल्याने त्याने हा प्रस्ताव धुडकावला. पुढे फेसबुकने ‘व्हाॅट्सअॅप’ कंपनी ताब्यात घेतली पण स्नॅपचॅटचा पसारा वाढतच गेला.
आता ‘स्नॅपचॅट’चे शेअर्स अमेरिकेतल्या शेअर बाजारात उपलब्ध होणार आहेत. आणि या आयपीओ साठी ‘स्नॅपचॅट’ची व्हॅल्युएशन झालंय ते २० अब्ज डाॅलर्सचं!
एवन आणि मिरँडाने फक्त १२ मिलियन डाॅलर्सचं एक घर विकत घेतलंय. आणि या दोघांचा साखरपुडाही झालाय! २६व्या वर्षी या अब्जाधीश सुपरमाॅडेलशी लग्न करून १ कोटी डाॅलर्सपेक्षा जास्त किमतीचं घर घेतोय !
आतातरी व्हाॅट्सअॅपवर चकाट्या पिटणं सोडा आणि आयुष्यात काहीतरी तीर मारा!