चोरलेल्या पाकिटात ५०० रुपयांच्या नोटा आढळल्याने चोराने पाकीट परत केल्याची अजब गजब घटना ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. इतकेच नाही तर चोराने या व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावत पाकीटात आता १००, १०० रुपयांच्या नोटा बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार ग्रेटर नोएडा येथे राहणा-या विकास कुमार यांचे पाकिट मोटार सायकलवरून आलेल्या चोराने मारले. पण पुढे गेल्यावर मात्र कुमार यांच्या पाकिटात ५०० च्या तीन नोटा आढळल्याने हे चोर मागे फिरले त्यांनी कुमार यांच्या तोंडावर पाकीट फेकत त्यांना मारले देखील. इतकेच नाही तर त्यांनी यापुढे पाकीटात १०० रुपयांच्या नोटा बाळगण्याचा सल्लाही दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्री अकराच्या सुमारास कुमार घरी परतत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदींनी मंगळवारी जाहिर केला त्यानंतर सगळेच जण संभ्रमात पडले. गुरूवारी बँका सुरू झाल्यानंतर जून्या नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांनी बँका उघडण्याआधीच रांगा लावल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून या नोटांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच मुलुंड येथे जुन्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्या ७३ वर्षांच्या विश्वनाथ वर्तक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.