खडकाळ प्रदेशात ‘डोंगराचा भूत’ असे चित्रण करणारे वन्य हिम बिबट्याचे छायाचित्राने नेटीझन्सच्या डोक्याचा भुगा पाडला आहे. निसर्ग ही एक सुंदर भेट आहे. निर्सग आपल्याला सतत काही ना काही देत असतो. या सुंदर निसर्गातील वेगवेगळे फोटोज इंटरनेट सतत चर्चेत असतात. या इंटरनेटमुळेच घर बसल्या आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो. अशाच लोकप्रिय निसर्ग फोटोजमध्ये एका हिम बिबट्याचा फोटो अॅड झाला आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या या फोटोत बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशात लपून बसलेला बिबट्या शोधणे कठीण आहे. हा फोटो मंगळवारी आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत तुम्ही यात प्राणी शोधू शकता का? असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी त्याच्या सभोवतालच्या वातावरणात सामाईक झालेल्या हिम बिबटया ‘फॅंटम मांजर’ आणि ‘डोंगराचे भूत’ म्हटले आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात बिबट्या शोधणे जवळजवळ अशक्य झाले आहे. तरीही अनेक नेटीझन्स त्या फोटोमधल्या बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
Phantom cat….!They are called ghost of the mountains.
If you can locate. @ryancragun pic.twitter.com/sG5nMyqM0S— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) July 13, 2021
इथे आहे हिम बिबटया!
तुम्हाला अजूनही हिम बिबटया सापडला नसेल तर शोधायला आम्ही मदत करतो. फोटोला जवळून पाहिल्यास हिम बिबटया फोटोच्या उजव्या कोपर्यात बर्फात बसलेला दिसेल.
कमेंट्सचा पाऊस
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोखाली असंख्य कमेंट्स आल्या आहेत. तसेच ट्विट १५० हून अधिक लोकांनी पुन्हा शेअर केलं आहे. शेअर करतांना काहींनी त्यांना हिम बिबटया कुठे आहे हे सापडले असल्यामुळे उत्तरासोबत रीट्विट केले आहे.