हिम बिबट्याचं नाव तुम्ही क्वचितच एकलं असेल.हिम बिबट हा अतिशय दुर्मिळ प्रजातीतील वन्यजीव असून या प्रजातीतील बिबटे सहज दिसत नाहीत. जगातील केवळ 12 देशांतच त्याचे वास्तव्य दिसते. मात्र तरिही हिम बिबट्या हे पृथ्वीवरील सर्वात चपळ शिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. असाच एक शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5 ते 7 सेकंदात शिकार फत्ते –
लडाखच्या डोंगररांगांतील गवतात चरणाऱ्या मेंढीवर हा हिम बिबट्या नजर ठेऊन असल्याचं सुरुवातीला पाहायला मिळतंय. त्यानंतर आजुबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत हा चपळ हिम बिबट्या केवळ 5 ते 7 सेकंदातच सुमारे एक किलोमीटरचे अंतर कापत आपली शिकार पकडतो. मेंढींच्या मागे धावताना डोंगर उतारावर संतुलन बिघडल्याने बिबट्या पडतोही. मात्र पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत पुन्हा शिकारीमागे धावायला लागतो. मेंढी जीव वाचवण्यासाठी डोंगराच्या उतारावर पळताना खाली रस्त्यावर पडते. ती पुन्हा उठायच्या आतच बिबट्या तिच्यावर झडप घालतो आणि तिची मान पकडतो. शिकार जबड्यात धरून तो लगेच पुन्हा डोंगर चढायला लागतो.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – असंही एक गाव! जिथं राहण्यासाठी सरकार देतंय 50 लाख रुपये, मात्र ‘या’ आहेत अटी..
42 सेकंदांचा हा दुर्मिळ व्हिडिओ लडाखच्या हेमिस शुपचेनमधील श्यापू नामक गावाचा आहे. हे गाव कारगिल आणि लेहदरम्यान वसले आहे. अतिशय धोकादायक उतरणीवरील मेंढीची शिकार करणाऱ्या हिम बिबट्याचा हा व्हिडिओ समोरच्या डोंगरावरील स्थानिकांनी रेकॉर्ड केला आहे. भारतात हिम बिबट्याची घटती संख्या पाहून सरकारने याचा समावेश दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांत केला आहे. हिम बिबट्यांच्या कातडीसाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली गेली त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांच्या अधिवासावर झालेल्या मानवी आक्रमणामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.