Eagle Eye In The Sky Viral Video : पाण्यात लपलेला मासा किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या सापाची शिकार करण्यासाठी आकाशात भरारी घेतलेल्या गरुड वाऱ्याच्या वेगासारखा जमिनीवर उतरतो. गरुडाची नजर एव्हढी तीक्ष्ण असते की, शेकडो किलोमीटर दूर असलेल्या प्राण्यांची शिकार करणं या पक्षाला अवघड वाटत नाही. पण एक गरुड पक्षी शिकार करण्याचा मूड नसल्यावर थेट बर्फाळ प्रदेशात जाऊन चकरा मारतो आणि थंड वातावरणात मनमुराद आनंद लुटतो. हे सुंदर दृष्य गरुडाच्या पंखांना लावलेल्या कॅमेरात कैद झाले आहेत. बर्फाळ प्रदेशातील गरुडाच्या उंच भरारीच्या जबरदस्त व्हिडीओनं नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर या गरुडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
बर्फाळ प्रदेशात जाणाऱ्या गरुडाची उंच भरारी पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हायरल झालेला हा व्हिडीओ इतका सुंदर आहे, ज्यामध्ये बर्फाळ प्रदेशातील नयनरम्य दृष्य पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेला हा सुंदर नजारा पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला उदंड प्रतिसाद दिला आहे. एक गरुड पक्षी बर्फाळ प्रदेशात भरारी घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. गरुडाच्या पंखांना कॅमेरा लावण्यात आल्याने निसर्गातील सुंदर दृष्य व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजला असून आतापर्यंत या व्हिडीओला ५.१ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. @thefigen नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
गरुडाची नजर किती तीक्ष्ण असते, हे या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण बर्फाळ प्रदेशात उचं पर्वतरांगांची भरारी घेताना गरुड पक्षी आजूबाजूचा डोंगर काळजीपूर्वक पाहताना या व्हिडीओत दिसत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याला सामोरं जाऊन गरुड या बर्फाच्या डोंगरात भरारी घेण्याचा आनंद लुटत आहे. पण गरुडालाही बर्फाच्या डोंगरात गेल्यावर माणसांप्रमाणे हु़डहुडी भरली असावी, असा अंदाज नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. गरुडाने बर्फाळ डोंगरात घेतलेली भरारी इंटरनेटवर तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून त्यांनी जबरदस्त प्रतिक्रियाही या व्हिडीओला दिल्या आहेत.