एका बर्फाळ डोंगरावर राहणाऱ्या हिमालयीन तपकिरी अस्वलाचे डोके तेलाच्या डब्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बहादुर या हिमालयीन तपकिरी अस्वलाच्या पिल्लाला भारतीय सैनिकांनी दयाळूपणे वाचवले. अज्ञात, दुर्गम, उच्च-उंचीच्या भागात पार पडलेली ही बचाव मोहिमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये सैनिक बर्फातून सावधपणे अस्वलापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. सुरुवातीला, त्यांनी हाताने तेलाचा डब्बा काढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अस्वलाच्या पिल्लाला दुखापत होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यांनी ते उघडण्यासाठी साधनांचा वापर केला. संयम आणि काळजी घेऊन त्यांनी प्राण्याला कोणतीही इजा न करता पिल्लाची सुटका केली.

बचाव केल्यानंतर सैनिकांनी पिल्लांना थोडे अन्न दिले. अनेक तास तो सैनिकांच्या जवळ राहिले. त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नाते दिसत होते.

हेही वाचा –Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral

व्हिडिओ पहा:

व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या सहानुभूती आणि जलद कृतीबद्दल सैनिकांचे कौतुक केले. अनेकांनी याचे वर्णन भारतीय लष्कराच्या देशाचे आणि परिसरातील वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे.

एका वापरकर्त्याने लिहिले, “नेहमीच तारणहार.” आणखी एका युजरने कमेंट केली की, “प्रेम प्रेम प्रेम… आमच्या लष्काराला आणि अर्थातच हा छोटा बहादूरसाठी”

हेही वाचा –धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral

तिसऱ्या व्यक्तीने लिहिले, “सुदैवाने अस्वल सुखरूप बचावले.” चौथ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “एवढ्या उंचीवर तेलाचा डब्बा कोणी सोडला याबद्दल प्रश्न उपस्थित आहे.”