Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात काही रडवतात तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मदत करत राहायची आपल्याला मदत लागली की आपल्यालाही असंच कुणीतरी येऊन अनोळखी मदत नक्की करणार. आयुष्यात काही करा किंवा नका करु मात्र एक चांगला व्यक्ती जरुन व्हा. हे आपण लहानपणापासून एकत आलो आहोत. याचंच एक उदाहरण देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता तुम्ही म्हणाल हा श्लोक कशासाठी तर. या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे आपण जे करणार तेच आपल्याकडे दुप्पटीने परत येणार. त्यामुळे रोजचं आयुष्य जगताना आपल्याकडून जेवढी मदत एखाद्याला करता येईल तेवढी करावी. या व्हिडीओंमध्ये तुम्ही पाहू शकता, लोक कशाप्रकारे कोणताही स्वार्थ नसताना एकमेकांची मदत करत आहे. एका पडलेल्या माणसाला हात देणं, रस्त्याच्या कडेला गारठत असलेल्या कुत्र्याच्या अंगावर कापड टाकणे. तसेच, अपघात होऊ नये म्हणून गाडीवरचा बर्फ साफ करणं. या छोट्या छोट्या गोष्टींतून माणूसकीची उदाहरणं पाहायला मिळतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘झिम्मा २’ ची परदेशातही क्रेझ; कॅनडामध्ये -२°C वातावरणात तरुणीचा साडी नेसून डान्स, VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @the_viralvideos या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So be a good person and help people around you video goes viral srk