सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की तुमचे हसून हसून पोट दुखेल. हा व्हिडीओ आहे दोन चोरांचा. एका चालत्या गाडीमधून चोरी करतानाच हा व्हिडीओ बघून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही अशा अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील, ज्यामध्ये दुकानातून किंवा घरातील सर्व सामान चोरून नेले जाते आणि कोणाच्या लक्षात देखील येत नाही. सीसीटीव्हीला चकमा देऊन सर्व सामान पळवून नेणारेही अनेक चोर आहेत. याशिवाय काही इतके निडर असतात की, ते बिनदिक्कत चोरी करून पळून जातात. जगात असे अनेक चोर आहेत जे चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात आणि त्यामुळे ते पकडलेही जात नाहीत.

चमत्कारिक गाव… इथं अनेकांना आहे एकच किडनी; कारण वाचून बसेल धक्का

या व्हिडीओमध्ये दिसणारे, रस्त्यावरील चालत्या वाहनातून चोरी करणारे इतके बिनधास्त चोर तुम्ही क्वचितच पाहिले असतील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. यामध्ये चोरट्यांनी चोरीची जी पद्धत अवलंबली आहे, ती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ.

Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका चालत्या गाडीमध्ये काही सामान आहे आणि एक व्यक्ती मागून या गाडीतील सामान उतरववून गाडीच्या मागे असलेल्या दुचाकीस्वाराला देत आहे. सुरुवातीला ते काय करत आहेत हे कळत नाही, पण काही वेळाने हे चोरीचे प्रकरण असल्याचे समजते. तुम्ही इतके निडर चोर क्वचितच पाहिले असतील, जे रस्त्यावरून चालत्या वाहनातून चोरी करतात. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो तुम्हाला नक्कीच हसवेल.

हा व्हिडीओ कुठचा आहे माहीत नाही, पण तो भारतातील कुठल्यातरी ठिकाणचा आहे. हा व्हिडीओ swami_7773 या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो १.७ दशलक्षाहून अधिक म्हणजे १७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर या व्हिडीओला ४७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.