जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जिथे काही लोक हे वर्णद्वेषी असतात, त्यामुळे त्या देशात बाहेरून आलेल्या अनेकांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो. अशा कितीतरी घटना घडल्या असतील, माणसानं दुसऱ्या माणसाचा वर्णावरून द्वेष केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील पण कधी एखादं यंत्र देखील वर्णद्वेष करून वागत असल्याचं तुम्ही ऐकलंय का ? एका माणसानं ट्विटवर एक व्हिडिओ अपलोड केलाय आणि त्यानं असा दावा केलाय की हे यंत्र माणसाचा वर्ण बघून त्याप्रमाणे काम करतं.

‘एफिगबो’ या ट्विटवर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीनं दावा केलाय की इथे बसवण्यात आलेला सोप डिस्पेन्सर माणसाच्या त्वचेचा वर्ण बघून त्याप्रमाणे काम करतो. त्यानं आपलोड केलेल्या व्हिडिओमधून ते सिद्धही करून दाखवून दाखवलं. जेव्हा त्यानं आपला हात डिस्पेन्सर समोर धरला तेव्हा त्यातून लिक्विड सोप बाहेर आला. पण जेव्हा त्यानं आपल्या हातावर काळा रंग लावला तेव्हा मात्र या डिस्पेन्सरमधून लिक्विड येणं बंद झालं. त्यानं अनेकदा हा प्रयोग करून पाहिला. तेव्हा सोप डिस्पेन्सर बनवणारी कंपनी वर्णद्वेषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण अनेकांनी मात्र त्याचं हे मत खोडून काढलं आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे होत असावं असंही अनेकांचं म्हणणं आहे. तेव्हा नक्की काय हे समजत नाही पण याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader