फिरोजशहा कोटला मैदानात गुरुवारी रंगलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारत जरी हरला तरी सोशल मीडियावर मात्र या सामन्यापेक्षा सामना पाहायला आलेल्या आणि ऐन डाव रंगात असताना झोपी गेलेल्या मुलीची जास्त चर्चा होत आहे. नेहमीच सामन्याबरोबर प्रेक्षकांवर देखील कॅमेरा फिरवला जातो. प्रेक्षकांचा तो उत्साह, आपल्या आवडत्या क्रिकेटरच्या नावाचा जल्लोष सारे काही सामाना रंगत असताना शिगेला पोहचले असते, त्यामुळे खेळाडूंबरोबर या प्रेक्षकांच्या चेह-यावरचे हावभाव टीपण्याचा प्रयत्न कॅमेरामनचा असतो. कॅमेरा आपल्याकडे आला की प्रेक्षकांचा उत्साह देखील आणखी वाढतो पण काल रंगलेल्या मॅचेमध्ये प्रेक्षकांकडे कॅमेरा वळवताना एका कॅमेरामनचे जे दृश्य टिपले ते मात्र इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

सामना रंगत आहे. दोन्ही टीमवर असलेला ताण स्पष्ट जाणवत आहे. प्रेक्षकही थोडे गंभीर होऊन सामना पाहत आहे अशात हा सामाना पाहायला आलेली एक मुलगी मात्र आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावर डोके ठेवून शांत झोपली आहे. पांढरे कपडे आणि पांढरा चष्मा घातलेल्या या मुलीकडे कॅमेरामनचे लक्ष जाताच त्याने कितीतरी वेळ तिच्यावर कॅमेरा रोखून धरला,  तिच्या मैत्रिणींने हे लक्षात येताच तिला उठवले यावेळी आपल्याला लाखो मुले पाहत असतील असा विचार डोक्यात आल्याने वरमलेल्या या मुलीचे हावभावही पाहण्यासारखेच होते. त्यामुळे झोपी गेलेली ही सुंदर मुलगी इंटरनेटवर फारच चर्चेत आली.

काही वेळाने पुन्हा कॅमेरामनने त्याच मुलीकडे कॅमेरा रोखून धरला पण यावेळी मात्र मुलगी जागी होती. नेटीझन्सने या मुलीला ‘स्लिपिंग गर्ल’ असे नाव दिले आहे. फटक्यात प्रसिद्धी मिळवायची असेल तर सामना सुरू असताना तुम्हाला एक डुलकी काढावी लागले असे विनोद होत आहेत. तर झोपी गेलेल्या मुलीला उठवल्याबद्दल कॅमेरामनला बक्षीस द्या अशीही विनोदी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

Story img Loader