Pink Color Barbie Food Menu Video Viral : मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर बार्बी चित्रपट शुक्रवारी २१ जुलैला प्रदर्शित झाला. परंतु, बार्बी चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला आणि पावसाळ्यात ‘बार्बी फिव्हर’ने डोकं वर काढलं आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक तरुणींना बार्बीचं वेड लागल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अशातच बार्बीच्या मार्केटिंग टीमनेही दिल्लीतील कमलानगर येथील एका कॅफेत गुलाबी रंगाचे पदार्थ बनवून बार्बीचं भन्नाट प्रमोशन केलं आहे. पिंक बार्बी मेन्यू अशी थिम असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

न्यूयॉर्क शहरातील शेफ रितीका या कॅफेची मालकीण आहे. बार्बी चित्रपटाची लोकप्रियता पाहून या कॅफेत बार्बी मेन्यूमध्ये गुलाबी रंगाचा बर्गर, मिल्क शेक आणि गुलाबी सॉसमध्ये फ्रेंच फ्राईज असल्याचं या बार्बी मेन्यूत दिसत आहे. विशेष म्हणजे गुलाबी रंगाचा पास्ता आणि पिंक सॅंडलचा केकही बनवण्यात आल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Tomato Optical Illusion: चेरीच्या ट्रेमध्ये लपलाय एक टोमॅटो, ज्यांना कळलं टोमॅटोचं महत्व तेच शोधतील ५ सेकंदात

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कुलज्योती धिंगरा या बार्बी मेन्यूमधील गुलाबी रंगाचा सॅंडलच्या आकाराचा केक खात असल्याचं इन्स्टाग्राम व्हिडीओ दिसत आहे. बार्बी चित्रपटाबद्दल लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया येत असून काही जणांना हा चित्रपट खूप मनोरंजन करणारा आहे, असं वाटलं. प्रसिद्ध मेटल डॉलवर अधारित हा चित्रपट अनेक तरुणींना आवडला आहे. इजा रे, दुआ लिपा, एम्मा मॅक्ये, सीमू लियू यांसारख्या कलाकारांनी जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader