Transgender Viral Video: शाहरुख खान-दीपिका पदुकोण स्टारर पठाण चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सुपरहीट झाल्यानंतर सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यानं आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असल्याने प्रेक्षकांना पठाण सिनेमाचे वेध लागले आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाने बोल्ड अंदाजात केलेला डान्स पाहून संपूर्ण सिनेविश्वातील कलाकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गाण्याचे रिक्रिएशन केलेले व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच ‘झुमे जो पठाण’ हे गाणंही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण शेख खुशी नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने पठाण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच बोल्ड डान्सचे नवे रंग उधळले आहेत. तृतीयपंथीयाने बेशरम रंग गाण्यावर एका व्यक्तीसमोर भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तृतीयपंथीयाच्या बेशरम रंग गाण्यावरील दिलखेचक अदा पाहून नेटकरी वाहवा करताना दिसत आहेत.
तृतीयपंथीयाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “दीदी तू खूप…”
बेशरम रंग गाण्यावर शेखने एका व्यक्तीसमोर भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 25 जानेवारीला पठाण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या तृतीयपंथीयाने बेशरम रंग गाण्यावर नवे रंग उधळले आहेत. या बोल्ड डान्सचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या तृतीयपंथीयाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बेशरम रंग गाण्याचा व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांच्या मनाला भुरळ पाडली आहे. एका इव्हेंटच्या मंडपात शेख एका ज्येष्ठ नागरिकासमोर बोल्ड अंदाजात ठुमके लगावताना या व्हिडिओत दिसत आहे. शेखने बेशरम रंग गाण्यावर केलेला भन्नाट डान्स इंटरनेटवर हजारो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून भन्नना प्रतिक्रियांचा वर्षावही केला जात आहे.
इथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुम्ही खूप सुंदर आणि जबरदस्त आहात.” दुसऱ्या एका नेटकऱ्यानं म्हटलं, “दीदी तू खूप क्यूट आहेस.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “तुम्ही खूप टॅलेंटेड असून अप्रतिम डान्स केला आहे.” “खूप चांगलं डान्स केलं, हे खूप सुंदर आहे.”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. जपानच्या तरुणीनंही बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त डान्स करून व्हिडीओ mayojapan नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता. हा व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड गाजला होता. या व्हिडीओला 108 k हून अधिक व्यूज मिळाले.