आजकाल लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यासाठी कधी ते धोकादायक स्टंट करतात तर कधी प्रँक व्हिडिओ शूट करतात. इतकेच नव्हे तर आता काही लोक इतरांना त्रास देऊन आपला व्हिडीओ इतरांपेक्षा वेगळा ठरावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे उदाहरण समोर आलं आहे. सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोशल मीडियावर काही लाईक मिळण्यासाठी एका मुलाने चक्क लोकांना थप्पड मारल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अमेरिकेतील टेक्सासमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ह्यूस्टन येथील एका पार्कमध्ये एक मुलगा व्हिडिओ बनवण्यासाठी आला आणि त्याने पार्कमधील लोकांवर हल्ला करायला सुरुवात केली. तो लोकांना मारत असल्याच्या घटनेचे व्हिडिओ शूट केले होते. व्हिडिओत दिसत आहे की, एक मुलगा अचानक येतो आणि लोकांना मारहाण करतो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक घाबरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य
Elder man bike stunt with cylinder went viral on social media viral video
आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

हेही पाहा- VIDEO : दारुपुढे माणुसकी हारली! अपघातग्रस्त कारमधील ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी लोकांनी पळवल्या दारुच्या बाटल्या

हा व्हिडीओ शूट करणाऱ्या १९ वर्षीय मुलाचे नाव अल्फोर्ड लुईस असं आहे. लुईसने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. शिवाय त्याचे कृत्य अशोभनीय असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त करताच लुईसने आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, “माझ्याकडून एक चूक झाली आणि प्रत्येकजण चुका करतो.”

त्याने पुढे सांगितलं की, लोकांवर अचानक हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्यातून लाईक आणि व्ह्युज मिळवायचे होते. दरम्यान, लुईसच्या पालकांनीही मुलाच्या कृतीवर निराशा व्यक्त केली आहे. हे प्रकरण तापल्यानंतर लुईसने दावा केला की, व्हिडिओमधील केवळ वाईट कृतीचा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. व्हिडिओत पुढे मी त्या व्यक्तीच्या हाहात हात दिल्याचं आणि त्याला मिठी मारल्याचा भाग जाणूनबुजून कट केला आहे. मात्र, नको ते स्टंट करुन आणि लोकांना त्रास देऊन असे व्हिडीओ बनवने वाईटच असल्याच्या कमेंट नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.

Story img Loader