डिजिधन मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भीम’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने केंद्र सरकारने शुक्रवारी भीम हे अॅप लाँच केले. या नव्या अॅपवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ‘भीम’ मोबाईल अॅपचे अनावरण केले. या अॅपवर आता सोशल मीडियावर नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. या अॅपचे स्वागत केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या अॅपला देऊन मोदींनी  ख-या अर्थाने त्यांच्याविषयी असलेला आदर दाखवून दिला आहे अशी प्रतिक्रिया वकिल प्रशांत पटेल यांनी दिली आहे. राज्यवर्धन सिंह राठौर यांनी देखील या अॅपचे विशेष कौतुक करत ट्विट केले आहे.  कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपण वेगाने प्रगती करत असून त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. सुहेल सेठ यांनी देखील मजेशीर प्रतिक्रिया यावर नोंदवली आहे. या अॅपचे नाव बदलण्याची मागणी आता काँग्रेस करेल आणि ते नाव छोटा भीम करायला भाग पाडेल असे मार्मिक ट्विट त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे निवडणुका लक्षात घेऊन मोदींनी हे अॅप काढले आहे अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

आधार कार्डच्या आधारे चालणा-या या अॅपद्वारे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे. सरकारने डिजिटल व्यवहारांमध्ये लकी ड्रॉ काढून बक्षीस दिले जाणार आहे. पण या अॅपवर ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला. केंद्र सरकारने एका लॉटरी अॅपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असून यातून त्यांची विकृत मानसिकता दिसते. या अॅपला आंबेडकर यांचे नाव देऊन मोदी सरकारने मागासवर्गीयांचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली.

https://twitter.com/ippatel/status/814817427104104448

https://twitter.com/sagarcasm/status/814821340049854464

Story img Loader