केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील इतर अनेक तरतुदींपैकी आंध्र प्रदेश व बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांची विशेष चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारला पाठिंबा दिल्याची परतफेड म्हणून या दोन राज्यांसाठी घसघशीत निधी दिल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात असताना यात नेटिझन्सही मागे नाहीत. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रील्सस्टार्सच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आलं आहे! सोशल मीडियावर अर्थसंकल्पाबाबत असंख रील्स व्हायरल होऊ लागले असून हे Video मोठ्या प्रमाणावर शेअरही होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्पावरच्या गाण्याचा Video व्हायरल!

आरजे प्रिन्सी पारीख नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या तरुणीने एक गाणंच तयार करून शेअर केलं आहे. या रीलमध्ये अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या तरतुदी तिनं गाण्याच्या रूपात म्हटल्या आहेत. त्यात शेवटी करदात्यांच्या हाती काहीच न लागल्याचं सांगताना “मैं हूँ टॅक्स पेअर, हुआ मेरा मोये मोयो” असं ही तरुणी म्हणत आहे.

पोलिटिकल एरिट्झ नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक माणूस नोटांची बंडलं घेऊन पळताना दिसत असल्याचा Video शेअर करण्यात आलe आहे. त्या त्या राज्याच्या नावानुसार या व्यक्तीच्या हातातील बंडलं कमी-जास्त होताना दिसत आहेत.

हेही वाचा: Budget 2024 for Maharashtra : अर्थसंकल्पात महाराष्ट्र आहे कुठे ?

एका रीलमध्ये सर्व प्रकारचे टॅक्स वाढवल्यामुळे आम्ही गाडी विकून सामोश्यांची गाडी लावायला जात आहोत, असं दोन मित्र सांगताना दिसत आहेत.

बिहारसाठी २६ हजार कोटी, पण त्याचं होणार काय?

एका रीलमध्ये गोविंदाच्या चित्रपटाला एक सीन अर्थसंकल्पावरची प्रतिक्रिया म्हणून दाखवण्यात आला आहे. यात बिहारमधील रस्ते प्रकल्पांसाठी जाहीर झालेल्या २६ हजार कोटींच्या घोषणेवर टिप्पणी करण्यात आली आहे.

एकानं तर या २६ हजार कोटींच्या निधीचं बिहारमध्ये काय होईल? यावर खोचक टिप्पणी करताना तेथील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं आहे. बिहारमधील रस्त्यांसाठी देण्यात आलेला निधी भ्रष्टाचारात जाऊ शकतो, असं भाष्य या रीलमध्ये करण्यात आलं आहे.

एका युजरनं इतर राज्य बिहार व आंध्र प्रदेशकडे कशा भावनेनं पाहात असतील, यासंदर्भातलं एक भन्नाट मीम शेअर केलं आहे.

असे अनेक रील्स व मीम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय नेतेमंडळी माध्यमांवर बोलताना त्यांची भूमिका मांडत असताना रील्सस्टार्स मात्र रील्सच्या माध्यमातून अर्थसंकल्पात त्यांना नेमकं काय दिसलं, यावर व्यक्त होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media trending reels on budget 2024 viral bihar andhra pradesh fund pmw