दिल्लीतल्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो असं म्हणतात आणि बऱ्याच अंशी खरंही आहे ते. भारतातलं सर्वाधिक लोकसंख्येचं हे राज्य लोकसभेत सगळ्यात जास्त खासदार पाठवतं. त्यामुळे यूपीवर ज्याची सत्ता त्याचा दिल्लीवर एक पाय असतो. या सत्तासंघर्षात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांही महत्त्वाच्या ठरतात.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या राज्यात भाजपने लक्षणीय यश मिळवलं आहे. यूपी निवडणुकांच्या काही काळ आधी काँग्रेस आणि अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी यांच्यात युती झाल्यावर भाजपला चांगली टक्कर मिळणार असं चित्र निर्माण झालं होतं. या दाव्यामध्ये दमही होता. कारण वडिलांशी भांडून समाजवादी पक्षाची सूत्रं हातात घेतलेल्या अखिलेश यादव यांना आपलं नेत्ृत्व आणखी बळकट करण्यासाठी एका प्रस्थापित शक्तीची गरज होती. तर उत्तर प्रदेशमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं नसलेल्या काँग्रेसला समाजवादी पक्षाची ‘रस्त्यावरची ताकद’ फायदेशीर ठरणार होती. एका अर्थाने दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असणारी ही आघाडी भाजपला चांगली टक्कर देईल अशी अटकळ बांधली गेली होती. पण प्रत्यक्षात सपा-काँग्रेस सपाट झाले.
आता यावरच सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं आहे. तर पहा यूपी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस- सपावरच्या जोक्सचे काही नुस्खे
SP+congress alliance take off in UP… #ElectionResults #VerdictWithTimes #Decision2017 #UttarPradesh #ElectionsResults2017 pic.twitter.com/g0UlE95OE8
— Dr Dang (@Dr_Dang_) March 11, 2017
२. गुरमेहर कौरच्या वादावरून सपा- काँग्रेसची खेचली
Haha.. This one is Epic.. SP would have done certainly better if there was no alliance with Cong #ElectionResults pic.twitter.com/HsqlIjxvnc
— Ankit Chaudhary (@entrepreneur987) March 11, 2017
३. ‘काँग्रेस आणि समाजवादी पक्ष निकाल जाहीर झाल्यावर…’
SP and Congress after today election results pic.twitter.com/QIFFkRxcLG
— SUNNY GUPTA (@SunnyGupta30) March 11, 2017
४. बापरे !
#ElectionResults Akhilesh & Rahul Feel Sorry pic.twitter.com/o2kF5ggUzo
— Amit Patil (@meetkpatil) March 11, 2017
५. तुम से ना हो पायेगा!
Beta tumse na ho Payega…. #ElectionResults #UPelectionResults pic.twitter.com/dSsxZIBkGM
— Billa HMP (@Angrez_billa) March 11, 2017
आजकाल जे काही घडतं त्याचे पडसाद सोशल मीडियावर लगेच उमटतात. उत्तर प्रदेश निवडणुकांचा निकालही याला अपवाद ठरला नाहीये.