कडक ऊन….डोक्यावर तळपता सुर्य…घामाने भिजलेलं अंग आणि त्यात कोरडा पडलेला घसा..अशीच काहीशी परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी आहे. जून महिना सुरु झाला असला तरी अद्याप पावसाचा काही पत्ता नाही. ऊनाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आजोबा भर ऊनात वाटसरुंना पाणी पाजून त्यांची तहान भागवत असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ नवी दिल्लीतील असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत आजोबा स्कुटर घेऊन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं दिसत आहे. त्यांनी स्कुटवर पाण्याचे कॅन ठेवले असून ग्लासही दिसत आहेत. एकीकडे लोक ऊनात सावली शोधत असताना आजोबा कडक ऊनात उभं राहून लोकांना पाण्याच्या बाटल्या भरुन देत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनेकांनी आजोबांचं कौतुक केलं असून त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवल्याचं म्हटलं आहे.